Tuesday, November 1, 2011


*****### कट्ट्यावरच्या आठवणी....###*****





एके सायंकाळी ऑफिस मधनं घराकडे कूच करत होतो...
दिवसभराच्या कामाने थकलेली पावलं हळूच उचलत होतो..
तेवढ्यात कोपऱ्यातल्या चाहवाल्याच्या कट्ट्यावर नजर पडली...
अन त्या कट्ट्याच्या आठवणींची बिजली हळूच हृदयात कडकडली..


अजूनही काळजात घर करून आहे त्या कट्ट्यावरच्या आठवणींचे सत्र..
त्या इवल्याश्या कट्ट्यावर बनलेले अनगीनत मित्र....
त्या कट्ट्यावर केलेली धमाल अन बिनधास्त मस्ती...
चहाची चुसाकी मारता मारता ठरवलेली पुढील आयुष्याची रस्ती...


world economy वर आम्ही expert लोकांनी केलेले संवाद...
अन मुलीनवरन मित्र मित्रान मध्ये होणारे ते पोरकट वाद...
तिथे प्रत्येकजण आपल्या आयुष्याची भलीमोठी चित्र रंगवायचा...
"बस एकदा हे पूर्ण होऊ दे मग बघ" हे हर एक जन आम्हाला ऐकवायचा...


चहाच्या प्याल्याबरोबर  सिगारेटची साथ देखील असायची...
अन रोज सायंकाळी ती मला तेथून जाताना दिसायची...
रोज लपतछपत फक्त आमच्या नजरांचीच भेट होत गेली...
ते दिवस तर निघून गेले तिची आठवण मात्र काळजात घर करून राहिली..


खरच कॉलेज लाईफ मध्ये त्या कट्ट्यावरच आम्ही खुलून-बहरून जगायचो..
साला दिवसभरचा टेन्शन त्या चाहत प्यायचो अन कीगारेत च्या धुव्यात उडवायचो..
त्या चहाच्या कट्ट्यात अजबच जादू अजबच मजा होती...
अन टेन्शन वाल्या लाईफ मधनं तीच तर एकमात्र राजा होती..


हळूहळू आयुष्याचा पर्व बदलला, कट्ट्यावरची ती लाईफ संपली..
त्या कात्त्यासोबत हळूच नकळत नाती तुटली..
आता ते बेफान हसणं,चिडवणं,मनवणं सारं काही संपला आहे..
अन सर्वांनी कामाच्या धाग्यांनी आपला आयुष्य घट्ट गुंफलं  आहे..


आता फक्त रोज सायंकाळी घरी जाताना कट्ट्यावर बसलेला घोळका दिसतो...
"का आपण मोठे झालो?" हा प्रश्न मनातच स्वतःला पुसतो...
आता तो सुवर्ण काळ गेला,फक्त तो कट्टा आपल्या आठवणी सोडून गेला आहे..
त्या आठवणीनी चेहऱ्यावर हसू , मात्र डोळा थोडा ओला आहे...

No comments:

Post a Comment